प्रसाद कुलकर्णी - नव्या पिढीचा आनंदी आणि आशावादी कवी.

उत्कटता हा त्याच्या कवितेचा आणि स्वभावाचाच गुणविशेष.
तो आयुष्यावर प्रेम करतो. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगावर, प्रत्येक व्यक्तीवर, प्रत्येक घटनेवर, प्रत्येक अनुभवावर तो प्रेम करतो.
मराठी भाषेत शुभेच्छापत्रं सुरु करण्याचा मान त्याच्याकडे जातो.
४ कवितासंग्रह.... १२ चित्रपट.... १६ ध्वनिफिती.... ४५०० हून अधिक शुभेच्छापत्रं.... लोकप्रभा, सकाळ, नवशक्ती आणि लोकसत्तासारख्या ६ लोकप्रिय दैनिकातलं स्तंभलेखन.... जाहीरात क्षेत्रातल्या टॉपच्या जाहिरात एजन्सीज करता कॉपीरायटींग.... रेडीयो, टिव्हीवरचे अगणित कार्यक्रम.... एवढं बख्खळ ग्रहबळ पाठीशी असूनही त्याची खरी ओळख आहे आनंदयात्री हीच.


Friday 12 February 2010

महागायिका उर्मिला धनगरचा सत्कार प्रसाद कुलकर्णी यांच्या हस्ते

झी टीव्ही वरील आयडिया सारेगमप ची विजेती उर्मिला धनगर हिचा सत्कार नुकताच अंबरनाथ येथे प्रसाद कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला. या सोहळ्याला विम्को चे जनरल मॅनेजर श्री राजीव सावंत आणि उर्मिलाचे गुरु श्री अच्युत जोशी हे उपस्थित होते.
या समारंभाची काही क्षणचित्रे.

2 comments:

  1. ashe kavatuk manapasun sagalyanich karuyaa !
    Savadhan's Blog

    ReplyDelete
  2. very nice.
    badhai donon ko bhi!

    ReplyDelete