्सारस्वत चैतन्य गौरव पुरस्कारांच्या निमित्ताने सुमनताईंचा (अर्थात सुमन कल्याणपूर यांचा) सोनेरी सहवास लाभला आणि मी मोहरुन गेलो. जो स्वर्गीय स्वर ऐकत मी लहानाचा मोठा झालो, त्या स्वराच्या सोबतीने मी एक दिवस डायस शेअर करणार आहे, हे मला या आधी कुणी सांगितलं असतं तर मी त्याला वेड्यात काढलं असतं. पण तो योग असा अवचित माझ्या आयुष्यात आला. नुसता डायस शेअर नव्हे तर या निमित्ताने मी चांगला महीनाभर सुमनताईंच्या संपर्कात होतो. त्यांच्या घरी येत जात होतो. त्यांच साधेपण, त्यांची नजाकत, त्यांच हळवेपण अनुभवत होतो आणि श्रीमंत होत होतो. त्यांच्या स्वरांनी माझं किशोरवयही कसं मंतरून टाकलंय हे मी त्यांना सांगीतलं, तेव्हा त्या किती सुंदर लाजल्या म्हणून सांगू.....!
-प्रसाद कुलकर्णी