प्रसाद कुलकर्णी - नव्या पिढीचा आनंदी आणि आशावादी कवी.

उत्कटता हा त्याच्या कवितेचा आणि स्वभावाचाच गुणविशेष.
तो आयुष्यावर प्रेम करतो. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगावर, प्रत्येक व्यक्तीवर, प्रत्येक घटनेवर, प्रत्येक अनुभवावर तो प्रेम करतो.
मराठी भाषेत शुभेच्छापत्रं सुरु करण्याचा मान त्याच्याकडे जातो.
४ कवितासंग्रह.... १२ चित्रपट.... १६ ध्वनिफिती.... ४५०० हून अधिक शुभेच्छापत्रं.... लोकप्रभा, सकाळ, नवशक्ती आणि लोकसत्तासारख्या ६ लोकप्रिय दैनिकातलं स्तंभलेखन.... जाहीरात क्षेत्रातल्या टॉपच्या जाहिरात एजन्सीज करता कॉपीरायटींग.... रेडीयो, टिव्हीवरचे अगणित कार्यक्रम.... एवढं बख्खळ ग्रहबळ पाठीशी असूनही त्याची खरी ओळख आहे आनंदयात्री हीच.


Wednesday, 26 December 2012

मी तुला शोधण्यासाठी मौनात उतरलो तेव्हा...


मी तुला शोधण्यासाठी मौनात उतरलो तेव्हा

चूपचाप फसवूनी मजला हलकेच जखडला त्यांनी

तू गवसलीस ही नाही, मी नजरबंदही झालो

शब्दांच्या तीरकमठ्यांनी मज वीदीर्ण केला त्यांनी

-प्रसाद कुलकर्णी

Monday, 17 December 2012

आनंदयात्राचे आगामी कार्यक्रम



२२ डिसेंबर - वाल्मी(GPR 1983 कुटुंब संमेलन)
२३ डिसेंबर - औरंगाबाद
२४ डिसेंबर सकाळी-  शिवाजी महाविद्यालय चिखली (बुलडाणा)
२४ डिसेंबर संध्याकाळी- खामगाव तालुका पोलीस कुटुंब संमेलन
२९ डिसेंबर - काकडे कॉलेज, सोमेश्वर नगर (बारामती)
३० डिसेंबर - अत्रे कट्टा गोरेगाव ( कविसंमेलन)
६ जानेवारी – अत्रे कट्टा गोरेगाव (पुस्तक प्रकाशन)
१२ जानेवारी – बदलापुर
२ फेब्रुवारी – सोलापूर
१५ फेब्रुवारी – रविंद्र नाट्यमंदीर, प्रभादेवी