प्रसाद कुलकर्णी यांच्या ‘आनंदयात्रा’ या सदाबहार कार्यक्रमाचा ५०० वा प्रयोग शुक्रवार १५ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ७ वाजता पु ल देशपांडे मिनी थिएटर, प्रभादेवी येथे साजरा होतो आहे.
ज्येष्ठ शिवसेना नेते
श्री. सुभाष देसाई आणि झी २४ तास वाहिनी
चे मुख्य संपादक श्री.
उदय निर्गुडकर हे या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहाणार आहेत.
याच प्रसंगी, ‘प्रासादिक’ हे त्यांचे आनंदी
आयुष्यावरचे पुस्तक या समारंभात प्रकाशित होत आहे. राजेन्द्र प्रकाशन या नामवंत संस्थेद्वारे त्याची निर्मिती झालेली आहे.
कार्यक्रम सर्व रसिकांकरता खुला आहे. तरीही माझ्या भ्रमणध्वनीवर किंवा ईमेल ने आपले येणे मला कळवू शकलात तर आपल्यासाठी जागा राखून ठेवणे सोपे जाईल.
या व्यक्तिगत निमंत्रणाचा स्वीकार करुन त्या दिवशी
अगत्याने येण्याचे करावे ही विनंती.
-नम्रता
9757200499