प्रसाद कुलकर्णी - नव्या पिढीचा आनंदी आणि आशावादी कवी.

उत्कटता हा त्याच्या कवितेचा आणि स्वभावाचाच गुणविशेष.
तो आयुष्यावर प्रेम करतो. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगावर, प्रत्येक व्यक्तीवर, प्रत्येक घटनेवर, प्रत्येक अनुभवावर तो प्रेम करतो.
मराठी भाषेत शुभेच्छापत्रं सुरु करण्याचा मान त्याच्याकडे जातो.
४ कवितासंग्रह.... १२ चित्रपट.... १६ ध्वनिफिती.... ४५०० हून अधिक शुभेच्छापत्रं.... लोकप्रभा, सकाळ, नवशक्ती आणि लोकसत्तासारख्या ६ लोकप्रिय दैनिकातलं स्तंभलेखन.... जाहीरात क्षेत्रातल्या टॉपच्या जाहिरात एजन्सीज करता कॉपीरायटींग.... रेडीयो, टिव्हीवरचे अगणित कार्यक्रम.... एवढं बख्खळ ग्रहबळ पाठीशी असूनही त्याची खरी ओळख आहे आनंदयात्री हीच.


Sunday, 9 September 2012

श्रावण झरतो आभाळातून

श्रावण झरतो आभाळातून
व्रुंदावन त्यालाच विचारी.
भिजला चाफा, चिंब सायली
विरक्त का रे तुळस बिचारी.....?
-प्रसाद कुलकर्णी

Thursday, 16 August 2012

आनंदयात्रेच्या विदर्भ दौऱ्याचे प्रेस रिपोर्टस

लोकमतची जाहिरात
मुक्काम पोस्ट अकोला, दिनांक २९ जून २०१२

मुक्काम पोस्ट बुलडाणा, दिनांक ३० जून २०१२

मुक्काम पोस्ट खामगाव, दिनांक ०१ जुलै २०१२

Sunday, 8 April 2012

शान मराठीत पहिल्यांदा गायला माझ्याकरता!

जुईली या माझ्या पहिल्या मराठी चित्रपटासाठी शान गायला,
त्या रेकॉर्डींगचा हा संस्मरणीय फोटो.
तारीख होती २२ जुलै २००२.
शानचंही हे पहिलंच मराठी गाणं होतं असं स्वत: शान म्हणाला.

शान मराठीत आपल्यासाठी पहिल्यांदा गायल्याचा दावा अनेकजण करतात,
खास त्यांच्याकरता ही माझ्या संग्रहातली आठवण.
गाण्याचे बोल होते-

'मी तोच तोच, तू तिच तिच पण स्पर्श भासतो नवा नवा
हे गीत तेच ही प्रीत तिच पण हर्ष वाटतो नवा नवा!'

या गाण्याच्या शूटींगचा हॅडिकॅम व्हिडियोही माझ्याकडे उपल्ब्ध आहे.

Wednesday, 14 December 2011

ती मौनाने बोलत जाते

ती मौनाने बोलत जाते
मी प्राणांनी ऐकत जातो
ती गालावर गोंदत जाते
मी ओठांनी वाचत जातो!

ती सुंदर ती लोभसवाणी
आनंदाची गाते गाणी
ती नाजुकसे फूल जुईचे
तिच्या मनाला पंख सायीचे
ती श्वासांवर तोलत जाते
मी श्वासांनी झेलत जातो
ती गालावर गोंदत जाते
मी ओठांनी वाचत जातो!


ती चाफ्यापरी मुसमुसलेली
ती केतकीपरी रसरसलेली
ती दरवळते जुई जाईतुन
ती रिमझिमते श्रावण होऊन
ती टपटपते प्राजक्तातुन
मी नजरेने वेचत जातो
ती गालावर गोंदत जाते
मी ओठांनी वाचत जातो!

-प्रसाद कुलकर्णी

.

Thursday, 8 December 2011

'मन मोहरले' ध्वनिमुद्रिकेचे प्रकाशन

‎'मन मोहरले' हा माझा १६ वा म्युझिक अल्बम (आणि पहिला सोलो) मंगळवार दिनांक २२/११/ २०११ या दिवशी संगीतकार राहुल रानडे, सिनेदिग्दर्शक राजू पार्सेकर आणि आमदार अशोकभाऊ जाधव यांच्या उपस्थितीत प्रकाशित झाला.
जेष्ठ संगीतकार सय्यद अली यांनी माझ्या शब्दांना स्वरसाज चढवला असून इंडियन आयडॉल अभिजीत सावंत, अभिलाषा चेल्लम आणि मंगेश बोरगावकर यांचा आवाज या गाण्यांना लाभला आहे. सिद्धेश सावंत आणि महेश खोपडे या दोन रसिक तरुणांच्या प्रयत्नातून ही सीडी साकार झाली आहे.

आणि एच.एम.व्ही. सारेगामा इंडिया प्रा.लि या नामांकीत संस्थेने या सीडीची निर्मिती केली आहे.

-प्रसाद कुलकर्णी







Monday, 23 May 2011

म्हाताऱ्या आईची गोष्ट

मुंबई सकाळ मध्ये या वर्षीच्या १ जानेवारीपासून दर सोमवारी माझं 'गुड मॉर्निंग' हे सदर सुरु आहे.
सकाळ हे माझं होम पीच!. आणि त्यामुळे संपादकीय विभागातले माझे मित्र नेहमीच माझ्याकडून चांगलं चांगलं लिहून घेतात.
हे सदर खूप लोकप्रिय झालय आणि मला मेल्स वा फोनद्वारे त्याचा सतत फीडबॅक मिळत असतो.
क्रुतार्थ वाटावी अशी गोष्ट म्हणजे अलीकडेच मंगेश पाडगावकरांनी मला प्रत्यक्ष भेटीत सांगितलं की तुमचं सदर खूप चांगलं असतं आणि मी ते नियमित वाचतो. तुम्ही खूप छान लिहिता. यावर सुखद धक्का म्हणून की काय त्याच्या दुसऱ्याच दिवशी मला ज्यॆष्ठ पत्रकार कुमार केतकरांची मेल आली आणि त्यातही त्यांनी माझ्या लिखाणाचं मनापासून कौतुक केलं होतं. केतकरांसारख्या पत्रकारीतेतल्या भिष्माचार्यांनी स्व:ताहून अशी दाद देणं ही माझ्याकरता भारावून टाकणारी गोष्ट होती. त्यावर कडी म्हणून की काय, दोन दिवसांनी एका समारंभात ज्येष्ठ लेखक मधु मंगेश कर्णिक भेटले. त्यांनीही माझी पाठ थोपटत हीच भावना व्यक्त केली.
आता हे सारं मला माझ्या ब्लॉगवरल्या मित्रांशी शेअर करावसं वाटलं. विशेष करुन या सदरात मागील आठवड्यात मी लिहिलेली 'म्हाताऱ्या आईची गोष्ट'. या एका गोष्टीनेच मला खूप मोठ्ठं फॅन फॉलोईंग मिळवून दिलं. आणि माझ्या या भावना मी सकाळचे संपादक पद्मभूषण देशपांडे यांच्याशीही शेअर केल्या.
खरं खणजे ही गोष्ट नसून एक मुक्त कविता आहे. आणि ती वाचून तुमचा तुमच्या आईवडीलांकडे पहाण्याचा द्रुष्टीकोन बदलला तर ती मी माझ्या कवितेची परतफेड समजतो. क्रुपया तुमच्या भावना आणि प्रतिक्रिया मला माझ्या मेलवर कळवायला विसरु नका.
-प्रसाद कुलकर्णी
kulpras@yahoo.co.in - on behalf of Namrata

Saturday, 14 May 2011

आनंदयात्रा ४२५ व्या प्रयोगाची क्षणचित्रे

आनंदयात्राचा एक विशेष प्रयोग गुरुवार दिनांक २१ एप्रिल रोजी माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरात संपन्न झाला. या सोहळ्याला आदरणीय पंडीत यशवंत देव, छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष, ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर, ज्येष्ठ गोदी कामगार नेते आणि माजी महापौर शांती पटेल आणि मी मराठी वाहिनीचे पराग छापेकर उपस्थित होते. या शानदार सोहळ्याची ही क्षणचित्रे.
सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळींच्या हस्ते प्रसाद्चा सत्कार
आईच्या भूमिकेतून आशालताबाई आशीर्वाद देताना
देवांचा मूड असा मस्त लागला आणि गौतमजींची दिलखुलास दाद
देवांचा ही सत्कार
आणि हे "मेनी मूड्स"
रंगून गेलेले श्रोते आणि कार्यक्रमाच्या शेवटी प्रसाद सुखटणकर या वेड्या मित्राने भारावून जाऊन मारलेली मिठी आणि भारावून बघणारी त्याची आई -(नम्रता १४०५२०११)