प्रसाद कुलकर्णी - नव्या पिढीचा आनंदी आणि आशावादी कवी.
उत्कटता हा त्याच्या कवितेचा आणि स्वभावाचाच गुणविशेष.
तो आयुष्यावर प्रेम करतो. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगावर, प्रत्येक व्यक्तीवर, प्रत्येक घटनेवर, प्रत्येक अनुभवावर तो प्रेम करतो.
मराठी भाषेत शुभेच्छापत्रं सुरु करण्याचा मान त्याच्याकडे जातो.
४ कवितासंग्रह.... १२ चित्रपट.... १६ ध्वनिफिती.... ४५०० हून अधिक शुभेच्छापत्रं.... लोकप्रभा, सकाळ, नवशक्ती आणि लोकसत्तासारख्या ६ लोकप्रिय दैनिकातलं स्तंभलेखन.... जाहीरात क्षेत्रातल्या टॉपच्या जाहिरात एजन्सीज करता कॉपीरायटींग.... रेडीयो, टिव्हीवरचे अगणित कार्यक्रम.... एवढं बख्खळ ग्रहबळ पाठीशी असूनही त्याची खरी ओळख आहे आनंदयात्री हीच.

Sunday, 10 March 2013
Saturday, 9 February 2013
आनंदयात्राच्या ५०० व्या सोहळ्याचे सादर निमंत्रण
प्रसाद कुलकर्णी यांच्या ‘आनंदयात्रा’ या सदाबहार कार्यक्रमाचा ५०० वा प्रयोग शुक्रवार १५ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ७ वाजता पु ल देशपांडे मिनी थिएटर, प्रभादेवी येथे साजरा होतो आहे.
ज्येष्ठ शिवसेना नेते
श्री. सुभाष देसाई आणि झी २४ तास वाहिनी
चे मुख्य संपादक श्री.
उदय निर्गुडकर हे या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहाणार आहेत.
याच प्रसंगी, ‘प्रासादिक’ हे त्यांचे आनंदी
आयुष्यावरचे पुस्तक या समारंभात प्रकाशित होत आहे. राजेन्द्र प्रकाशन या नामवंत संस्थेद्वारे त्याची निर्मिती झालेली आहे.
कार्यक्रम सर्व रसिकांकरता खुला आहे. तरीही माझ्या भ्रमणध्वनीवर किंवा ईमेल ने आपले येणे मला कळवू शकलात तर आपल्यासाठी जागा राखून ठेवणे सोपे जाईल.
या व्यक्तिगत निमंत्रणाचा स्वीकार करुन त्या दिवशी
अगत्याने येण्याचे करावे ही विनंती.
-नम्रता
9757200499
Wednesday, 26 December 2012
मी तुला शोधण्यासाठी मौनात उतरलो तेव्हा...
मी तुला
शोधण्यासाठी मौनात उतरलो तेव्हा
चूपचाप
फसवूनी मजला हलकेच जखडला त्यांनी
तू गवसलीस ही
नाही, मी नजरबंदही झालो
शब्दांच्या
तीरकमठ्यांनी मज वीदीर्ण केला त्यांनी
-प्रसाद
कुलकर्णी
Monday, 17 December 2012
आनंदयात्राचे आगामी कार्यक्रम
२२ डिसेंबर - वाल्मी(GPR
1983 कुटुंब संमेलन)
२३ डिसेंबर - औरंगाबाद
२४ डिसेंबर सकाळी- शिवाजी महाविद्यालय चिखली (बुलडाणा)
२४ डिसेंबर संध्याकाळी-
खामगाव तालुका पोलीस कुटुंब संमेलन
२९ डिसेंबर - काकडे कॉलेज,
सोमेश्वर नगर (बारामती)
३० डिसेंबर - अत्रे कट्टा
गोरेगाव ( कविसंमेलन)
६ जानेवारी – अत्रे कट्टा
गोरेगाव (पुस्तक प्रकाशन)
१२ जानेवारी – बदलापुर
२ फेब्रुवारी – सोलापूर
१५ फेब्रुवारी – रविंद्र
नाट्यमंदीर, प्रभादेवी
Saturday, 29 September 2012
Sunday, 9 September 2012
श्रावण झरतो आभाळातून
श्रावण झरतो आभाळातून
व्रुंदावन त्यालाच विचारी.
भिजला चाफा, चिंब सायली
विरक्त का रे तुळस बिचारी.....?
-प्रसाद कुलकर्णी
व्रुंदावन त्यालाच विचारी.
भिजला चाफा, चिंब सायली
विरक्त का रे तुळस बिचारी.....?
-प्रसाद कुलकर्णी
Thursday, 16 August 2012
Subscribe to:
Posts (Atom)