प्रसाद कुलकर्णी - नव्या पिढीचा आनंदी आणि आशावादी कवी.

उत्कटता हा त्याच्या कवितेचा आणि स्वभावाचाच गुणविशेष.
तो आयुष्यावर प्रेम करतो. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगावर, प्रत्येक व्यक्तीवर, प्रत्येक घटनेवर, प्रत्येक अनुभवावर तो प्रेम करतो.
मराठी भाषेत शुभेच्छापत्रं सुरु करण्याचा मान त्याच्याकडे जातो.
४ कवितासंग्रह.... १२ चित्रपट.... १६ ध्वनिफिती.... ४५०० हून अधिक शुभेच्छापत्रं.... लोकप्रभा, सकाळ, नवशक्ती आणि लोकसत्तासारख्या ६ लोकप्रिय दैनिकातलं स्तंभलेखन.... जाहीरात क्षेत्रातल्या टॉपच्या जाहिरात एजन्सीज करता कॉपीरायटींग.... रेडीयो, टिव्हीवरचे अगणित कार्यक्रम.... एवढं बख्खळ ग्रहबळ पाठीशी असूनही त्याची खरी ओळख आहे आनंदयात्री हीच.


Monday, 9 February 2015

जळगावमध्ये आनंदयात्रेला तुडुंब प्रतिसाद

लोकमत सखी मंच ने  मागील महिन्यात  जळगाव येथे आयोजीत केलेल्या आनंदयात्रेचा हा चित्रमय  व्रुत्तांत. 

या कार्यक्रमाला एवढी गर्दी लोटली होती की १००० क्षमतेचा हॉल पूर्ण भरुन शेकडो रसिक मागे उभे होते.
धन्यवाद, लोकमत जळगाव.

Saturday, 21 September 2013

सह्याद्री वाहिनीवर थेट मुलाखत


प्रसाद कुलकर्णी यांची थेट मुलाखत मंगळवार, दिनांक २४ सप्टेंबर रोजी सह्याद्री वाहिनीवर दुपारी १.३० वाजता पहायला विसरु नका. आपण थेट  (LIVE) प्रश्नही विचारु शकता.

Saturday, 27 April 2013

अशीच यावी वेळ एकदा.... (अल्बम-सांजगारवा, कवी-प्रसाद कुलकर्णी)

अशीच यावी वेळ एकदा स्वप्नी देखील नसताना ,
असे घडावे अवचित काही, तुझ्या समिप मी असताना

उशीर व्हावा आणि मिळावी एकांताची वेळ अचानक ,
जवळ नसावे चिट्ट्पाखरू केवळ तुझी नि माझी जवळिक

मी लज्जित, अवगुंठित आणि संकोचाचा अंमल मनावर ,
विश्वामधले मार्दव सारे दाटून यावे तुझ्या मुखावर

मनात माझ्या 'तू बोलावे' तुझ्या मनीही तीच भावना ,
तूच पुसावे कुशल शेवटी, करून कसला वृथा बहाणा

संकोचाचे रेशीमपडदे हां हां म्हणता विरून जावे ,
समय सरावा मंदगतीने अन प्रीतीचे सूर जुळावे

तू मागावे माझ्यापाशी असे काहीसे निघताना ,
उगीच करावे नको नको मी हवेहवेसे असताना

हुशार तू पण, तुला कळावा अर्थ त्यातुनी लपलेला ,
आपुलकीच्या दिठीत भिजवुन मिठीत घ्यावे तू मजला

सचैल न्हावे चिंब भिजावे तुझ्या प्रितीच्या जलामध्ये ,
युगायुगांची आग विझावी त्या बेसावध क्षणांमध्ये

शब्दांवाचुन तुला कळावे गूज मनी या लपलेले ,
मुक्तपणे मी उधळून द्यावे जन्मभरी जे जपलेले
 - प्रसाद कुलकर्णी

Sunday, 10 March 2013

आनंदयात्रा ५०० व्या प्रयोगाची क्षणचित्रे





हाउसफुल्ल गर्दी आणि मान्यवरांची मांदियाळी


 
‘प्रासादिक’ या आनंदी आयुष्याचे रहस्य उलगडणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन

सुभाष देसाई आणि उदय निरगुडकर यांच्या हस्ते सत्कार







Saturday, 9 February 2013

आनंदयात्राच्या ५०० व्या सोहळ्याचे सादर निमंत्रण




प्रसाद कुलकर्णी यांच्याआनंदयात्राया सदाबहार कार्यक्रमाचा ५०० वा प्रयोग शुक्रवार १५ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी वाजता पु देशपांडे मिनी थिएटर, प्रभादेवी येथे साजरा होतो आहे.

ज्येष्ठ शिवसेना नेते श्री. सुभाष देसाई आणि झी २४ तास वाहिनी चे मुख्य संपादक श्री. उदय निर्गुडकर हे या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहाणार आहेत.

याच प्रसंगी, ‘प्रासादिकहे त्यांचे आनंदी आयुष्यावरचे पुस्तक या समारंभात प्रकाशित होत आहे. राजेन्द्र प्रकाशन या नामवंत संस्थेद्वारे त्याची निर्मिती झालेली आहे.

कार्यक्रम सर्व रसिकांकरता खुला आहे. तरीही माझ्या भ्रमणध्वनीवर किंवा ईमेल ने आपले येणे मला कळवू शकलात तर आपल्यासाठी जागा राखून ठेवणे सोपे जाईल.

या व्यक्तिगत निमंत्रणाचा स्वीकार करुन त्या दिवशी अगत्याने येण्याचे करावे ही विनंती.

-नम्रता

9757200499


 





Wednesday, 26 December 2012

मी तुला शोधण्यासाठी मौनात उतरलो तेव्हा...


मी तुला शोधण्यासाठी मौनात उतरलो तेव्हा

चूपचाप फसवूनी मजला हलकेच जखडला त्यांनी

तू गवसलीस ही नाही, मी नजरबंदही झालो

शब्दांच्या तीरकमठ्यांनी मज वीदीर्ण केला त्यांनी

-प्रसाद कुलकर्णी