प्रसाद कुलकर्णी - नव्या पिढीचा आनंदी आणि आशावादी कवी.

उत्कटता हा त्याच्या कवितेचा आणि स्वभावाचाच गुणविशेष.
तो आयुष्यावर प्रेम करतो. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगावर, प्रत्येक व्यक्तीवर, प्रत्येक घटनेवर, प्रत्येक अनुभवावर तो प्रेम करतो.
मराठी भाषेत शुभेच्छापत्रं सुरु करण्याचा मान त्याच्याकडे जातो.
४ कवितासंग्रह.... १२ चित्रपट.... १६ ध्वनिफिती.... ४५०० हून अधिक शुभेच्छापत्रं.... लोकप्रभा, सकाळ, नवशक्ती आणि लोकसत्तासारख्या ६ लोकप्रिय दैनिकातलं स्तंभलेखन.... जाहीरात क्षेत्रातल्या टॉपच्या जाहिरात एजन्सीज करता कॉपीरायटींग.... रेडीयो, टिव्हीवरचे अगणित कार्यक्रम.... एवढं बख्खळ ग्रहबळ पाठीशी असूनही त्याची खरी ओळख आहे आनंदयात्री हीच.


Sunday, 8 August 2010

छगन भुजबळ, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि मी

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री छगन भुजबळ यांना भेटणं हा माझ्याकरता परवा एक चकीत करणारा अनुभव होता. या भेटीची मला संधी मिळाली ती माझे जवळचे मित्र असलेल्या प्रमोद आणि शैलेश या पेडणेकर बंधूंमुळे. आणि ही भेट झाली त्यांच्या मलबार हिलवरल्या ’रामटेक’ या निवासास्थानी. साधारणपणे कोणत्याही राजकीय व्यक्तीला भेटायला मी फारसा उत्सुक नसतो. पण माझ्यावर निरातिशय प्रेम करणार्या प्रमोद्ची ही दांडगी इच्छा होती.
त्यांना भेटायला महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून माणसे आली होती. आणि आम्ही निघेपर्यंत अखंडीत येतही होती. मला अप्रूप वाटावी अशी गोष्ट ही की या सार्या धबडग्यातूनही त्यांनी माझ्यासाठी वेळ काढला.
आजच्या तरुणांना (खरे म्हणजे प्रत्येक व्यक्तीला) सकारात्मक मनोव्रुत्तीची गरज आहे याबद्दल ते माझ्याशी सहमत होते. ज्यांना भुजबळसाहेबांचा संघर्षमय राजकीय प्रवास ठाऊक आहे ते माझ्याशी याबाबतीत सहमत होतील की ते स्वत:च सकारात्मक मनोव्रुत्तीचं एक चालतंबोलतं उदाहरण आहेत. माझ्या आनंदयात्राच्या मुंबईतील पुढल्या प्रयोगाला यायचं त्यांनी कबूल केलंय. मी त्यांना ४००व्या प्रयोगाच्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवायचं नक्की केलंय.
-प्रसाद कुलकर्णी

3 comments:

  1. वा...! चारशेवा प्रयोग? ऎकायलाच किती बरं वाटतं. मला बी प्रयोगाला येवद्या की!

    ReplyDelete
  2. खुप छान ! पाहून अभिमान वाटला अस्शीच उत्तोरत्तर तुमची प्रगती व्हावी हीच इच्छा !!! पुन्हा तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा !!

    ReplyDelete