्कवितांची रिमझिम आणि .......................................................रसिकांचा प्रतिसाद
आणि असा लागलेला सूर....
४ जानेवारी २०११ रोजी प्रसादच्या आनंदयात्रा या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही लोकप्रिय ठरलेल्या एकपात्री कार्यक्रमाचा ४०० वा प्रयोग अकोला इथे आयोजीत करण्यात आला होता. ४ जानेवारी हा त्याचा वाढदिवस असूनही क्षितिज-विरंगुळा या अंध-अपंग-मतिमंद मुलांच्या संस्थेकरता निधी गोळा करुन देण्याच्या उद्देशाने त्याने हा कार्यक्रम विनामूल्य करायचं ठरवलं होतं.
३ जानेवारी रोजी मुंबईहून अकोल्याला घेऊन जाणारी हावडा मेल ८ तास लेट म्हणजे रात्री ८.३० ऐवजी दुसऱ्या दिवशी पहाटे ४.३० वाजता सुटली. ती सारी रात्र दादर रेल्वे स्टेशनवर कडाक्याच्या थंडीत घालवावी लागली. तिकीट चेकींग, बर्थ लावणे हे सारे सोपस्कार पूर्ण होईपर्यंत सकाळचे ६ वाजले होते. आता अंथरुणावर पडणार एवढ्यात वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा सेल वाजला. आणि त्यानंतर शुभेच्छांच्या फोन आणि एसेमेस ची रांगच लागली. एकदा त्याला वाटलं फोन बंद करुन टाकावा आणि झोपून जावं. मग त्याने विचार केला आपले मित्र, चाहते आपल्यावरच्या प्रेमापोटी आपल्याला फोन करतायत आणि आपण फोन बंद करायचा हे मुळीच बरोबर नाही. (दुसऱ्यांचा भावनांची आजवर तो नेहमीच कदर करत आलाय) आणि मग शुभेच्छांची ही आनंदयात्रा पुढचे बारा तास अकोला येईपर्यंत अशीच चालू राहिली. आदल्या २ रात्री रेकॉर्डींगकरता जागवलेल्या, ४ जानेवारीची रात्र दादर स्टेशनवर कडाक्याच्या थंडीत, अन १२ तासांचा मुंबई ते अकोला हा शुभेच्छांना प्रतिसाद देत केलेला प्रवास..... ४०० व्या कार्यक्रमाचे बारा वाजणार हे निश्चित झालं होतं. कारण दूरध्वनीवरून आधीच मिळालेल्या माहितीवरुन तिकीटं सारी विकली गेली होती, आणि प्रमिलाताई ओक सभाग्रुह आधीच हाऊसफुल्ल झालं होत.
पण संध्याकाळी ७ वाजता तो बोलायला उभा राहीला आणि पहिल्या पाच मिनिटांतच त्याने प्रेक्षकांना आपलसं केलं. पुढचे दोन तास सभाग्रुहात अखंड टाळ्या आणि हशा बरसत होता. दोन तासांनंतर तो अक्षरश: थकला तेव्हा त्याने कार्यक्रम नाईलाजाने थांबवला. अन्यथा रसिकाम्ची रात्री ११ वाजेपर्यंत थांबायचीही तयारी होती. या पोस्टवरती या कार्यक्रमाची काही छायाचित्रं आणि प्रेस रिपोर्टस टाकलेयत ते हा व्रुत्तांत अधोरेखीत करायला पुरेसे आहेत.
आणि हा कार्यक्रम सुरेख्ररित्या आयोजीत करण्याचं श्रेय जातं अकोल्याच्या सौ.मंजुश्री आणि उदय कुलकर्णी या दाम्पत्याला आणि त्यांच्या क्षितिज विरंगुळाच्या सर्व सहकाऱ्यांना..... आज या कार्यक्रमाला बरोब्बर १५ दिवस झाले तरी अकोल्याच्या रसिक प्रेक्षकाम्चे फोन्स किंवा मेल्स येतायत.
-नम्रता २१/०१/२०११
Purna anumodan!!
ReplyDeletesir,
ReplyDeletemalahi khup kavita vachayla,lihayla avadtata......mala ekda tumhala bhetayche ahe.....
mala mail karun sanga....koltearpan@gmail.com