प्रसाद कुलकर्णी - नव्या पिढीचा आनंदी आणि आशावादी कवी.
उत्कटता हा त्याच्या कवितेचा आणि स्वभावाचाच गुणविशेष.
तो आयुष्यावर प्रेम करतो. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगावर, प्रत्येक व्यक्तीवर, प्रत्येक घटनेवर, प्रत्येक अनुभवावर तो प्रेम करतो.
मराठी भाषेत शुभेच्छापत्रं सुरु करण्याचा मान त्याच्याकडे जातो.
४ कवितासंग्रह.... १२ चित्रपट.... १६ ध्वनिफिती.... ४५०० हून अधिक शुभेच्छापत्रं.... लोकप्रभा, सकाळ, नवशक्ती आणि लोकसत्तासारख्या ६ लोकप्रिय दैनिकातलं स्तंभलेखन.... जाहीरात क्षेत्रातल्या टॉपच्या जाहिरात एजन्सीज करता कॉपीरायटींग.... रेडीयो, टिव्हीवरचे अगणित कार्यक्रम.... एवढं बख्खळ ग्रहबळ पाठीशी असूनही त्याची खरी ओळख आहे आनंदयात्री हीच.
तो आयुष्यावर प्रेम करतो. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगावर, प्रत्येक व्यक्तीवर, प्रत्येक घटनेवर, प्रत्येक अनुभवावर तो प्रेम करतो.
मराठी भाषेत शुभेच्छापत्रं सुरु करण्याचा मान त्याच्याकडे जातो.
४ कवितासंग्रह.... १२ चित्रपट.... १६ ध्वनिफिती.... ४५०० हून अधिक शुभेच्छापत्रं.... लोकप्रभा, सकाळ, नवशक्ती आणि लोकसत्तासारख्या ६ लोकप्रिय दैनिकातलं स्तंभलेखन.... जाहीरात क्षेत्रातल्या टॉपच्या जाहिरात एजन्सीज करता कॉपीरायटींग.... रेडीयो, टिव्हीवरचे अगणित कार्यक्रम.... एवढं बख्खळ ग्रहबळ पाठीशी असूनही त्याची खरी ओळख आहे आनंदयात्री हीच.
Friday, 31 December 2010
आनंदयात्राचे विनामूल्य प्रयोग, नाबाद ४०० च्या निमित्ताने
'आनंदयात्रा' या माझ्या धमाल एकपात्री कार्यक्रमाचा ४०० वा प्रयोग ४ जानेवारी रोजी अकोला इथे क्षितिज विरंगुळा या अंध अपंग पुनर्वसन केंद्राच्या मदतीसाठी आयोजीत करण्यात आला आहे.
गेल्या ५-६ वर्षांत या कार्यक्रमाने ह्जारो श्रोत्यांना आनंद दिला. अन मला श्रोत्यांचे प्रेम आणि कौतुक! सामान्य श्रोत्यांपासून सर्वश्री मधु मंगेश कर्णिक, मंगेश पाडगावकर, कुमार केतकर, स्टार टीव्हीचे राजीव खांडेकर, यशवंत देव, श्रीधर फडके, शिवसेना नेते सुभाष देसाई,नटवर्य श्रीकांत मोघे, मोहनदास सुखटणकर, संगीतकार मिलींद इंगळे, अवधुत गुप्ते, कौशल इनामदार अशा असंख्य सेलिब्रेटीजचे प्रेमही मला लाभले. (ही काही नावे वानगीदाखल. प्रत्यक्षात ही यादी खूप् मोठी आहे).
केवळ महाराष्ट्रच नव्हे तर इंदौर, राजस्थान, बेंगलोर, दिल्ली, हैद्राबाद अशा परप्रांतातही आणि दुबई अबुधाबीसारख्या परदेशातही माझी ही आनंदयात्रा पोहोचली आणि श्रोत्यांना आनंद देऊन, मराठीची ओढ लाऊन आली.
मराठीत शुभेच्छापत्रांची मुहुर्तमेढ रोवण्याचे उत्तरदायित्व परमेश्वराने माझ्यावर सोपवले आणि ते मी निभावले म्हणून की काय आनंदयात्रेच्या रुपाने लोकांना आनंद वाटण्याचे आनंददायी कामही पुन्हा त्याने मला दिले.
नाबाद ४०० चा हा ट्प्पा आज गाठत असताना आयुष्याचे सार्थक झाल्यासारखे वाटते. आणि माझ्या या आनंदात सर्वांनाच सहभागी करुन घ्यावेसे वाटते.
समाजाने मला दिलेल्या अलोट प्रेमाविषयी क्रुतद्न्यता म्हणून पुढचे ४ आठवडे गरजू संस्थांसाठी विनामूल्य प्रयोग करण्याचे मी ठरवले आहे. (अर्थात काही अटींवर)..
-प्रसाद कुलकर्णी
kulpras@yahoo.co.in
Wednesday, 1 September 2010
पहिला इंडियन आयडॉल, अभिजीत सावंत गातोय माझी गाणी
नमस्कार.
्पहिला इंडियन आयडॉल, अभिजीत सावंतने आमच्या आगामी अल्बमकरता माझं गाणं गाण्याचा योग नुकताच आला. गॊड मुलगा आणि खूप मेहनती सुद्धा.
मी त्याचं वर्णन एका ओळीत करेन... milky boy with a silky voice.
चार तास आम्ही न कंटाळता एका गाण्याचं रेकॉर्डींग करत होतो. आणि आम्हाला ’मॅनेज’ करत होते आमचे संगीतकार, श्री. सैयद अली.
आमचा हा म्युझिक अल्बम सुपरहीट होणार असा आम्हाला तिघांनाही विश्वास आहे. फक्त आणखी तीन महीने वाट पहा.
त्यात एकूण आठ गाणी असतील.
या टायटल सॉंगचे बोल आहेत -
लपवूनही लपवेना, अन धीरही धरवेना
हीच खरी प्रेमाची रीत असावी का?
प्रीत जिला म्हणती ती हीच असावी का?
-प्रसाद कुलकर्णी
Sunday, 8 August 2010
छगन भुजबळ, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि मी
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री छगन भुजबळ यांना भेटणं हा माझ्याकरता परवा एक चकीत करणारा अनुभव होता. या भेटीची मला संधी मिळाली ती माझे जवळचे मित्र असलेल्या प्रमोद आणि शैलेश या पेडणेकर बंधूंमुळे. आणि ही भेट झाली त्यांच्या मलबार हिलवरल्या ’रामटेक’ या निवासास्थानी. साधारणपणे कोणत्याही राजकीय व्यक्तीला भेटायला मी फारसा उत्सुक नसतो. पण माझ्यावर निरातिशय प्रेम करणार्या प्रमोद्ची ही दांडगी इच्छा होती.
त्यांना भेटायला महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून माणसे आली होती. आणि आम्ही निघेपर्यंत अखंडीत येतही होती. मला अप्रूप वाटावी अशी गोष्ट ही की या सार्या धबडग्यातूनही त्यांनी माझ्यासाठी वेळ काढला.
आजच्या तरुणांना (खरे म्हणजे प्रत्येक व्यक्तीला) सकारात्मक मनोव्रुत्तीची गरज आहे याबद्दल ते माझ्याशी सहमत होते. ज्यांना भुजबळसाहेबांचा संघर्षमय राजकीय प्रवास ठाऊक आहे ते माझ्याशी याबाबतीत सहमत होतील की ते स्वत:च सकारात्मक मनोव्रुत्तीचं एक चालतंबोलतं उदाहरण आहेत. माझ्या आनंदयात्राच्या मुंबईतील पुढल्या प्रयोगाला यायचं त्यांनी कबूल केलंय. मी त्यांना ४००व्या प्रयोगाच्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवायचं नक्की केलंय.
-प्रसाद कुलकर्णी
Thursday, 22 July 2010
Monday, 21 June 2010
मंगेश पाडगावकर, अशोक नायगावकर आणि प्रसाद कुलकर्णी एकत्र
मंगेश पाडगावकर, अशोक नायगावकर आणि प्रसाद कुलकर्णी यांनी एकत्र एकाच मंचावर तीन तास धमाल केली, सोलापूर येथे दिनांक १८ जून २०१० रोजी. हा कार्यक्रम यशस्वीरित्या आयोजीत केला होता, थर्ड बेल एंटरटेनमेंट या इव्हेंट मॅनेजमेंट संस्थेने. तीन पिढ्यांचे तीन कवी एकत्र आणण्याची कल्पना होती स्वप्नील रास्ते यांची. नाट्यग्रुह तुडुंब भरुन बाहेर क्लोज सर्कीट टिव्ही लावावे लागले तेव्हा ती अपेक्षेपेक्षा यशस्वी झाल्याची पावती मिळाली. हे फोटो आहेत कार्यक्रम संपल्यानंतरच्या क्रुतार्थ क्षणांचे.
(ताजा कलम - वरील फोटोतले रिकामे ग्लास पाण्याचे आहेत याची नोंद घ्यावी.)
-नम्रता
Tuesday, 15 June 2010
आनंदयात्रेने ट्रिपल सेंच्युरी मारली तेव्हाची गोष्ट
१४ नोव्हेंबर २००७-
आनंदयात्रेचा ३०० वा प्रयोग मुंबईच्या रविंद्र नाट्यमंदिरात आयोजीत केला होता. प्रमुख पाहुणे होते, मधु मंगेश कर्णिक, लोकसत्ताचे संपादक कुमार केतकर आणि स्टार माझाचे राजीव खांडेकर. या प्रयोगाच्या पूर्वसंध्येला स्टार माझाने प्रसाद्ची जाहीर मुलाखत घेतली होती. १४ नोव्हेंबरचा प्रयोग जेवढा सुपरहिट झाला तेवढीच सुपरहिट होती ही मुलाखत देखील!
सोबत आहे त्या मुलाखतीची संपादित चित्रफीत...
Friday, 28 May 2010
सुमन सुगंधाची सोनेरी पखरण
्सारस्वत चैतन्य गौरव पुरस्कारांच्या निमित्ताने सुमनताईंचा (अर्थात सुमन कल्याणपूर यांचा) सोनेरी सहवास लाभला आणि मी मोहरुन गेलो. जो स्वर्गीय स्वर ऐकत मी लहानाचा मोठा झालो, त्या स्वराच्या सोबतीने मी एक दिवस डायस शेअर करणार आहे, हे मला या आधी कुणी सांगितलं असतं तर मी त्याला वेड्यात काढलं असतं. पण तो योग असा अवचित माझ्या आयुष्यात आला. नुसता डायस शेअर नव्हे तर या निमित्ताने मी चांगला महीनाभर सुमनताईंच्या संपर्कात होतो. त्यांच्या घरी येत जात होतो. त्यांच साधेपण, त्यांची नजाकत, त्यांच हळवेपण अनुभवत होतो आणि श्रीमंत होत होतो. त्यांच्या स्वरांनी माझं किशोरवयही कसं मंतरून टाकलंय हे मी त्यांना सांगीतलं, तेव्हा त्या किती सुंदर लाजल्या म्हणून सांगू.....!
-प्रसाद कुलकर्णी
Tuesday, 16 March 2010
पनवेल कल्चरल सेंटरमध्ये आनंदयात्रा चा प्रयोग
लोकसत्ता
पनवेल -२ मार्च
आनंद ही मानवी ्जीवनातील सर्वात अमूल्य गोष्ट आहे. परमेश्वराने ती आपल्याला विनामूल्य दिलेली आहे. तरी अनेकांना त्याची जाणीव नसते. असे प्रतिपादन लोकप्रिय कवी श्री प्रसाद कुलकर्णी यांनी केले. सांस्कृतिक क्षेत्रात आघाडीवर असणार्या ’पनवेल कल्चरल सेंटर’ तर्फे होळीनिमित्त कुलकर्णी यांचा आनंदयात्रा हा एकपात्री कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. विविध किस्से, कविता, अनुभव याद्वारे श्रोत्यांना तुफान हसवता हसवता त्यांनी मानवी नातेसंबंधाविषयी हृदयस्पर्शी विचार मांडून श्रोत्यांना अंतर्मुखही केले.
परमेश्वर दररोज आपल्याला २४ तासांचा चेक देतो. या धनादेशाच्या देणगीची बरयाच लोकांना कल्पना नसते. ज्या सुदैवी माणसांना याची जाणीव असते ते त्याचा पुरेपुर उपयोग करुन आपले आणि आपल्यासोबत इतरांचे जीवनही आनंददायी करुन टाकतात. त्यांच्या या निरिक्षणावर श्रोत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. मराठी शुभेच्छापत्रांची मुहुर्तमेढ रोवणारया या कवीने आपले या क्षेत्रातले खुसखुशीत अनुभवही यावेळी कथन केले.
अडीच तासांहून अधिक वेळ रंगलेल्या या कार्यक्रमाला श्रोत्यांचा भरभरुन प्रतिसाद लाभला. संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ जोशी यांनी त्यांचे स्वागत केले. तर नंदकुमार गोगटे यांनी त्यांचा परिचय करुन दिला.
(लोकसत्ता मधून साभार. सविस्तर महितीकरता संदर्भ लोकसत्ता, गुरुवार ०३ मार्च २०१०)
Friday, 12 February 2010
Thursday, 4 February 2010
Friday, 22 January 2010
प्रसाद : नव्या वर्षाची सुरुवात
्नवे वर्ष काय घेऊन येते आहे -
३१ जानेवारी - रत्नागिरी. सारस्वत मित्र या मासिकाच्या वर्धापन दिनानिमित्त
प्रेरणादायी कार्यक्रम ’बी पॉझिटिव्ह’
१२ फेब - ’बी पॉझिटिव्ह’ थळ वायशेत
१९ फेब - कॅमलिन लिमिटेड
२० फेब - नागपूर (आनंदयात्रा)
२६ फेब - नंदुरबार (बी पॉझिटिव्ह)
२७ फेब - धुळे (आनंदयात्रा)
१७ मार्च - बोरिवली (बी पॉझिटिव्ह)
याव्यतिरिक्त -
फ़ेब २०१० - नवा म्युझिक अल्बम श्रीधर फडकेंसोबत
मार्च २०१० - नवा म्युझिक अल्बम अशोक पत्की आणि मंगेश बोरगावकरसोबत
एप्रिल २०१० - ६ वा चित्रपट रिलिज होतोय - ’नातवंड’
एप्रिल २०१० - ७ वा चित्रपट रिलिज होतोय - ’मंगळसूत्र’
मे २०१० - थांबा आणि वाट पहा.....
Subscribe to:
Posts (Atom)